श्री अरविंदांची जीवनकथा पुनरावलोकन
१५ ऑगस्ट, १९४७ या दिवशी स्वतंत्र भारताचा जन्म झाला. १५ ऑगस्ट, १९७२ हा श्री अरविंदांचा जन्मदिवस आणि स्वतंत्र भारताचा वर्धापन दिन आणि त्याच दिवशी भारतीय पांचांगाप्रमाने गोकुळ अष्टमी,श्री कृष्ण जन्मदिन होते. हे सर्व पाहता हा सर्व योगायोग असेल का ? की याचा काही अर्थ आहे. असा प्रश्न पडतो. चला तर मग जाणून घेऊया श्री अरविंद कोण होते.पुस्तकातून समजलेले त्यांचे जीवन.... श्री अरविंद यांचे संपूर्ण नाव अरविंद कृष्णधन घोष असे आहे. डॉ कृष्णाधन घोष हे एक अत्यंत हुशार डॉक्टर. कोलकात्याच्या मेडिकल कॉलेज मधून पदवी घेऊन उच्च पदवीसाठी ते इंग्लंड ला गेले.त्या काळी भारत देश सोडून परदेशी जाणाऱ्याला वाळीत टाकले जाई, महापाप समजले जाई परंतु हे साहस त्यांनी त्या काळी केले व ते भारतात २ वर्षांनी परत आले रंगरूप बदलून पूर्णतः इंग्लिश बनून. पोशाख,राहणीमान अगदी इंग्लिश, इंग्लंड ची एम डी पदवी घेऊन.त्यांना भारताचे काहीच आवडत न्हवते, त्यांचे लग्न १९ व्या वर्षी स्वर्णलतेशी जाहले व त्यांना पाच मुले झाली त्यापैकी एक हे अरविंद. तीन भाऊ , एक बहिण, विजयभूषण, मनमोहन,बरिन आणि सरोजिनी. श्री अरविंद यांचे टोपण नाव ऑरो....